दोडामार्गात उद्या पिंपळेश्वर सभागृहात वीज ग्राहक मेळावा

ग्राहकांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी व्यापारी संघाचा पुढाकार
Edited by: संदीप देसाई
Published on: November 16, 2022 19:42 PM
views 234  views

दोडामार्ग : जिल्ह्यात व्यापारी संघाने तालुका स्तरावर वीज ग्राहकांच्या समस्या निवारण करिता ग्राहक मेळावे आयोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात सुद्धा वीज ग्राहक मेळाव्याचे उद्या १७ नोव्हेंबर रोजी पिंपळेश्वर सभागृह दोडामार्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ठीक १० वाजता सुरू होणार आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन दोडामार्ग व्यापारी संघातर्फे तालुकाध्यक्ष लवू मिरकर यांनी केले आहे.वीज बिलाबाबत असलेल्या तक्रारी, बंद असलेले पथदिवे, वाढीव वीजबिले, कमी दाबाचा वीज पुरवठा, महावितरणच्या विविध योजना आदी अनेक विषयांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी वर्ग, ग्राहक यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय.