
दोडामार्ग : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून दोडामार्ग शहरातही उद्या सोमवारी २२ जानेवारीला दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरवासीयांनी मुख्य चौकातही श्री राम प्रभूंचा मोठ फलक उभारले असून त्याला विद्युत रोषणाई केली आहे.
संपूर्ण शहरात चारही बाजूने भगवे ध्वज लावले असून शहरातील मारुती मंदिरात रोशनाई केली आहे. पिंपळेश्वर चौक, बाजारपेठ येथेही भव्य विद्युत रोषणाई व ध्वजपताका लावण्यात आल्या आहेत. तर मारुती मंदिरात सकाळी 9:00 वाजता अभिषेक, त्यानंतर रामजन्मभूमी साठी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
10:00 वाजता राम मंदिर संघर्षगाथा, 10.30 ते 11:00 पर्यंत राम नाम जप कीर्तन, 11:00 ते 12:28 अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण, 12.29 ला राम आरती, 12.45 घोषणा आणि प्रार्थना तर 1:00 ते 3:00 वाजे पर्यंत महाप्रसाद, 3:00 वाजता रामजन्मभूमीसाठी सतत 1990 ते 2024 आज पर्यंत कार्यरत रामभक्त, रामसेवक आणि कारसेवक यांचही येथे स्वागत करण्यात येणार आहे.
संध्याकाळी 7 वा. पिंपळेश्वर मंदिरात भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी मंदिरात मोहत्सव स्नान असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती दोडामार्ग मधील रामभक्त यांनी दिली आहे. शनिवारी रात्री नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, मनोज पार्सेकर, विशाल मणेरीकर यांसह शहरातील युवा वर्ग यांनी चौक सुशोभीकरण साठी विशेष मेहनत घेत राम महोत्सव नियोजन केलं आहे.