दोडामार्ग खरेदी विक्री संघ निवडणूक | भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध

राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, दळवी यांनी केले अभिनंदन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 19, 2022 14:49 PM
views 302  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दोडामार्ग यांची पंचवार्षिक निवडणूकित भारतीय जनता पार्टीचे पाच  उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यांचे नुकतेच राजन म्हापसेकर व एकनाथ नाडकर्णी तसेच तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी अभिनंदन केले. 

  भाजपाकडून नऊ फॉर्म भरण्यात आले होते. त्यापैकी पाच उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष दळवी यांनी दिलीय. त्याचे अभिनंदन करतेवेळी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, चंदू मळीक, तालुका उपाध्यक्ष आनंद तळणकर,शहर अध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर, लक्ष्मण आयनोडकर उपस्थित होते. निवडून आलेले सदस्य अभिमन्यू कुबल, संजय गवस, ज्ञानेश्वर रामा गवस, अशोक सावंत,  आदी उपस्थित होते.