
दोडामार्ग : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज दोडामार्ग भाजपच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी या हल्ल्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या झेंडा जाळण्यात आला.
सुरुवातीला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. जि.प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मनोगत व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे जि. प. चे माजी उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हपसेकर, तालुका प्रमुख दीपक गवस, नगरध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष दिवेदास गवस, शहर प्रमुख राजेश फुलारी, नगरपंचायत नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, नगरसेविका सध्या प्रसादी, क्रांती जाधव, रंगनाथ गवस, समीर रेडकर, संतोष म्हावळणकर, चंदू मळीक, उदय पास्ते, वैभव इनामदार, पिंटो गवस, सुधीर पनवेलकर आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.