
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर मणेरी येथे रस्त्याची अक्षरशः चालणच झाली आहे. वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच काम चव्हाट्यावर येत आहे. पावसाळ्या पूर्वी दोडामार्ग तालुक्यातील बरेचशे व्यवस्थित केले होते. मात्र, दोडामार्ग बांदा मार्गवरील मणेरी येथे रस्त्याची दुरावस्ता असताना देखील संबधित ठेकेदाराने तेवढाच रस्ता दुरुस्ती पासून वंचित ठेवला. त्यामुळे या रस्त्याची आता चाळणंच झाली आहे. या रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.