हेदूस सासोली येथे हनुमान जयंती उत्सव

‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ नाट्यप्रयोगाचं आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: March 31, 2026 15:43 PM
views 15  views

दोडामार्ग : हेदूस सासोली येथील हनुमान मंदिरात गुरुवारी २ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गुरुरवारी  सकाळी ६.०० वाजता हनुमान जन्मोत्सव व काकड आरती, दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.०० वाजता ग्रामस्थांचे सुमधुर भजन कार्यक्रम, त्यानंतर रात्री १०.३० वाजता पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या अंतर्गत लोकप्रिय आरोळकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांच्या वतीने ‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

या उत्सवाचे आयोजन हेदूस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.