वेळागर फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन

पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 29, 2025 17:36 PM
views 141  views

सिंधुदुर्गनगरी : शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले.

पालकमंत्री यावेळी म्हणाले की, शिरोडा-वेळागर येथे प्रस्तावित ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल. जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवला जाईल. भविष्यातही अशाच प्रकारे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करून विकासात्मक निर्णय घेतले जातील असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. या बैठकीस आमदार आमदार दीपक केसरकर, निलेश राणे,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार राजन तेली, जयप्रकाश चमनकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.