
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार निवडीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी जाहीर केले. देवगड अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली सुधीर राणे, मालवण अर्जुन बापर्डेकर, कुडाळ प्रशांत पोईपकर, सावंतवाडी सागर चव्हाण, वेंगुर्ला प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरी लवू म्हाडेश्वर, दोडामार्ग ओम देसाई, वैभववाडी महेश रावराणे या नऊ जणांची यावर्षीच्या म्हणजे सन २०२५२६ वर्षासाठी उत्कृष्ट पत्रकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकरिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी येतील पत्रकार भवनात अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी परिषद प्रतिनिधी गणेश जेठे , उपाध्यक्ष संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर, किशोर जैतापकर सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत,लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, संजय वालावलकर, अमित खोत, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा पत्रकार दिना दिवशी ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरव या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, सम्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी पुढारी न्युज चैनलचे संपादक प्रसन्ना जोशी यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आम. दीपकभाई केसरकर, आम. निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदि प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सिंधुनगरी येथील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.










