
दोडामार्ग : तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात चंदगड तालुका तसेच इतर भागातील कोंबड्या वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घाटात ये जा करणाऱ्या वाहनांना बाजू न देणे, पशु वाहतूक परवाना तसेच कोंबड्या खाण्यास योग्य आहेत असे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे लेखी पञ नसताना अवैध कोंबड्या वाहतूक केली जात आहे. या गाड्या तातडीने बंद कराव्यात नाहीतर दोडामार्ग येथे या गाड्या अडवू असा इशारा देणारे निवेदन दोडामार्ग येथील युवकांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले की, तिलारी घाटातून होणारी बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे चालक घाट उतरताना समोरच्या गाड्यांचा जराही विचार करत नाहीत. हे चालक दारू पिऊन गाड्या चालवतात आणि काही अघटीत घडले कि इथल्या एजंटची नावे समोर करतातअसा आरोप यावेळी करण्यात आला.
यासंदर्भात चालक आणि पोल्ट्री मालक यांना बोलावून त्यांना समज देऊन वाहतूक सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुनिल बोर्डेकर, समीर रेडकर, गौतम महाले, केशव काळबेकर, ओंकार रेडकर आदि उपस्थित होते.