
दोडामार्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकील्ल्याचा राष्ट्रीय धरोहर म्हणून "युनेस्का" च्या यादीत सामावेश झालेबद्दल रविवारी दोडामार्ग मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमींकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी येथील बाजारपेठ मधील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच फटाके वाजवून व उपस्थित जनसमुदायला पेढे वाटून आनंदत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सोनू गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, सचिव भूषण सावंत, खजिनदार सुशांत गवस, वैभव इनामदार, गोपाळ माजिक, रविंद्र खडपकर, प्रदिप गावडे, महेश गवस, सुदेश मळीक, कानू दळवी, श्रवणकुमार पुरोहित, प्रसाद रेडकर, संदिप घाडी, उमेश सावंत, समिर देसाई, प्रमोद गवस, समिर ठाकुर, तुळशीदास नाईक, गुरुदास नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते.