तेरवण - मेढे उपसरपंचपदी मायकल लोबो

Edited by: लवू परब
Published on: July 11, 2025 18:06 PM
views 116  views

दोडामार्ग : तेरवण - मेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मायकल लोबो यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच महेंद्र विष्णू नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य मायकल लोबो यांनी अर्ज भरला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपस्थित सरपंच सोनाली गवस, ग्रामसेवक अमित दळवी, ग्रा.पं. सदस्य यांनी नूतन उपसरपंच मायकल लोबो यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.