
दोडामार्ग : साटेली भेडशी थोरले भरड येथील त्या अनधिकृत इमारतीशी संबंध असलेले ते दुकान त्या मालकाने सुरु केले होते. स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सदरचे दुकान बंद करावे या साठी ग्रामपंचायत मध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस लावून पोलीस बंदोबस्तात बंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी उर्दू व अरबी शिक्षण देणारी साटेली भेडशी थोरले भरड येथील ती व अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. या इमारतीमध्ये गैरकारभार करणाऱ्या त्या व्यक्तीचे साटेली भेडशी येथील सर्व व्यवसाय बंद व्हावेत असा ठराव ग्रामपंचायतच्या विशेष सभेत घेण्यात आला होता. काही दिवस उघडल्यानंतर सदर व्यक्तीने साटेली भेडशील येथील आपले दुकान चालू केले होते. यावर स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेत हे दुकान बंद करावे असा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतला.या व्यक्तीने बळजबरीने दुकान सुरू केले असल्याने ग्रामस्थांनी आज दुपारी ग्रामपंचायत मध्ये ठिय्या मांडला. हे सुरू केलेले दुकान ग्रामपंचायतने बंद करावे अन्यथा आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
दोडामार्ग पोलिसांना याबाबत कळविण्यात आल. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने हे दुकान बंद करण्याची नोटीस बजावली.दुकान मालकाने नोटीस घेण्यास नकार दिला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस त्या दुकानाला चिकटवून पोलीस बंदोबस्त दुकान बंद केले.