दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील म्हावळणकर वाडी येथे गेले आठ दिवस भरपावसात नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल झाले आहेत. आज म्हावळणकर वाडी येथील नागरिकांनी नगरपंचायतला धडक दिल्यानंतर दोन दिवसात नळयोजना दुरुस्त करून पाणी सोडू असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी फोनद्वारे दिले.
नगरपंचायत हद्दीतील म्हावळणकर वाडी येथे गेल्या आठ दिवसापासून नळपाणी योजना बंद आहे. वारंवार नगरपंचायतला सांगून देखील दखल घेतली नाही. याच पार्श्वभूमीवर आज म्हावळणकर वाडी येथील नागरिकांनी नगरपंच्यातला धडक देत घेराव घातला. यावेळी संदेश म्हावळणकर, ज्ञानेश्वर कुंदेकर, लक्ष्मण कवठणकर, अर्जुन म्हावळणकर, मदन कुंदेकर, रुतेश म्हावळणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आलेल्या नागरिकांना फोन करून 2 दिवसात नळयोजना दुरुस्त करून पाणी सोडू असे आश्वासन दिले.