दोडामार्ग न.पं.मार्फत डास प्रतिबंधक औषध फवारणी

Edited by: संदीप देसाई
Published on: August 01, 2024 15:08 PM
views 129  views

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग शहरामध्ये पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगरपंचायत वतीने शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचायत वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी डास निर्मुलन मोहीम अंतर्गत डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपया योजना नगर परिषद मार्फत करण्यात येत आहेत. नगरपंचायत वतीने खबरदारी म्हणून उपया योजना स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. शहराला स्वच्छ ठेवणे व डेंग्यू आजारापासून नागरिकांनी कोणते उपाय करावे काय, काळजी घ्यावी या करिता घरोघरी जाऊन, मार्गदर्शक पत्रक वाटून  व घंटागाडी मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. पाण्याची टाकी किंवा पाणी साठवण करण्यासाठी सर्व प्रकारच्या जागी पाणी साठू नहे जेणेकरून त्या पाण्याच्या पृष्ठभागावर डेंगू सारखे मच्छर होऊ नये याची माहिती देण्यात येत आहे. शहरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात येत आहे. जेणेकरून वातावरण स्वच्छ राहावे मच्छर होऊ नये. शहरामधील नागरिकांच्या आरोग्याचा विषय असल्याकारणामुळे हि मोहीम नगरपंचायत घेत असून मोहिमे साठी विशेष पथक म्हणून कर्मचाऱ्याची नियुत्की करून संपूर्ण शहरात हि मोहीम जनजनजागृती घराघरात पोहचावी असा नगरपंचायतचा हेतू आहे अशी माहिती स्वच्छता विभागाचे शहर समन्वयक सिद्धेश शगले यांनी दिली.

 नगरपंचायत मार्फत सर्व उपया योजना राबविण्यात येत आहेत परंतु नागरिकांना आपली व कुटुंबाची काळजी म्हणून नगरपंचायत मार्फत सांगण्यात आलेल्या सूचनांना प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपले कसई-दोडामार्ग शहर आजरापासून दूर राहील. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखा, कचरा नगरपंचायत घंटागाडीत वेगळाकरून द्या, पाणी स्वच्छ ठिकाणी साठा करावा, सर्व कर्मचार्याना सहकार्य करावे असे आव्हान नगरपंचायतचे  मुख्याधिकारी श्री.सागर साळुखे व नगरपंचायत नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण यांनी केले आहे.