
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून दोडामार्ग शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना रॅबिज लस देण्याची मोहीम राबविण्यात आली. रॅबिज मुक्त दोडामार्ग शहर अशी मोहीम हाती घेऊन कसई - दोडामार्ग नगरपंचायतने एक पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले.
दोडामार्ग शहर किंवा आजूबाजूच्या सरकारी कार्यालय किंवा वस्तीच्या ठिकाणी दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना वाटेत येताना जाताना कुत्र्यांपासुन आपला बचाव करून यावे जावे लागते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना रॅबिजची लस देण्याची मोहीम कसई दोडामार्ग नगरपंचायत ने राबविली आहे.
सिंधुदुर्ग येथील पशुसंवर्धन पशुवैद्यकीय सेवा आयुक्तालय शिक्षण मोहीम सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कसई दोडामार्ग नगरपंचायतने ही रॅबिज लस येथील दोडामार्ग शहरातील पाळीव कुत्रे व मोकाट कुत्रे यांना रॅबिजची लस देऊन रॅबिज मुक्त दोडामार्ग शहर अशी संकल्पना घेऊन ही मोहीम राबविली.