तहसील निवासस्थान की भूतबंगला ?

लाखांची इमारत दुर्लक्षित !
Edited by: लवू परब
Published on: July 23, 2024 13:24 PM
views 157  views

दोडामार्ग : लाखो रुपये खर्च करून दोडामार्ग तहसीलदार यांचेसाठी शहरात बांधलेले निवासस्थान गेली अनेक वर्षे झाडाझुडपानी वेढलेल आहे. आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक तहसीलदार दोडामार्ग मध्ये येऊन गेलेत. मात्र केवळ एक तहसीलदार सोडले तर त्यांतर कुणीही या तहसीलदार  निवासस्थानाचा तथा बंगल्याचा कोणीही वापर केलेला नाही. त्याउलट देखभाल दुरुस्ती व स्वछते अभावी या टुमदार बंगला तथा निवस्थानाला येत्या काळात कुणी भूत बंगला म्हटल्यास नवल वाटू नये.


या निवासस्थानाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना मात्र वाढलेली झाडी झुडपे आणि मोठी झाडे यामुळे तसेच सरपटणारे प्राणी आदींचा धोका संभवत आहे. याबाबत येथील गौरीश राणे यांनी तर प्रशासनाच्या हा ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. जर या निवासस्थानाचा वापर करायचा नव्हता तर लाखो रुपये त्यावर खर्च करण्याची गरजच काय होती असा सवाल उपस्थित केला आहे. 

  दोडामार्ग तालुका निर्मिती झाली, स्वातंत्र्य तालुक्याची मुख्यालय इमारत झाली, तहसीलदार आले, तहसीलदार यांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवासस्थान बांधले. मात्र तहसीलदार राहणाऱ्या निवासस्थानाची देखभाल दुरुस्ती कोण करणार? असा प्रश्न पडला आहे. या प्रश्ना बरोबर शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले निवासस्थान कित्तेक वर्षे धुळखात पडले आहे. हे ही तितकेच महत्वाचे आहे.

 

देखभाल दुरुस्ती करून सेवेत आणावी

शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले तहसीलदार यांचे निवासस्थानाची सार्वजनिक बांधकामं विभागाने तात्काळ दुरुस्थी करून ते तहसीलदार यांना राहण्यासाठी सुस्थितीत करावें अशी मागणी शहर वासियांकडून केली जातं आहे. इमारतीच्या बाजूची झाडे कट करून समोरील दर्शनी भागात प्लेवर बॉक्स बसवण्यात यावे पाण्याची अडचण आलेली समस्या सोडवावी अश्या सर्व गोष्टी गाभीर्याने हाती घेतल्यावर तर  भविष्यात तालुक्यात येणारे तहसीलदार या निवासस्थानि राहू शकतात .


संरक्षक कठडे नगरपंचायतने रंगवले मग देखभाल दुरुस्ती कोण करणार?

तहसीलदार यांना राहण्यासाठी निवासस्थान बांधले लाखो रुये खर्च केले लगतच्या संरक्षक कठडे नगरपंचायतने रंगवले मग आतमधील देखभाल दुरुस्ती, स्वछता डागडुजी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झालाय. 


त्या निवासस्थानि आहे कोरोनाचे सामान

दरम्यान तहसील निवासस्थानची दुरावस्ता या संदर्भात काही जाणांना विचारणा केली असता सद्य स्थितीत त्या निवासस्थानि  कोरोनाला लालेले  सर्व सामान त्या ठिकाणी ठेवण्यात आल्याची कुजबुज सुरु आहे. मग ती इमारत तहसील दार यांना राहण्यासाठी आहे की सामान ठेवण्यासाठी? असाही प्रश्न उपस्तीत होत आहे


इमारत गेली दहा वर्षे दुरवस्थेत आहे. वाढलेल्या झाडी मुळे नक्की कोणती इमारत आहे असा प्रश्न दोडामार्ग वासियांच्या मनात उद्भवत आहे. काहींनी तर भूत बंगला असे नाव देखील दिले आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करुन बांधण्यात आलेली इमारत जर महसूल व बांधकाम विभागाला दुरूस्त करुन त्याचा योग्य वापर करता येत नसेल तर महसूल व बांधकाम विभागाने ती इमारत नगरपंचायत कसई दोडामार्ग कडे वर्ग करावी. नगरपंचायत कसई दोडामार्ग त्याचा योग्य वापर करण्यात येईल.


दुरुस्ती करण्यात संदर्भात बांधकामला पत्रव्यवहार करणार :तहसीलदार अरुण पवार 

 दरम्यान तहसीलदार अरुण पवार यांची भेट घेतली असता सदर निवासस्थानाविषयी विचारणा केली असता देखभाल दुरुस्ती संदर्भात आपण बांधकाम विभागाला पत्राव्यवहार करणार आहे. सदर इमारतीची स्वछता व दुरुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची व्य्वस्था करणार आहे असे तहसीलदार पवार यांनी सांगितले.