
दोडामार्ग : अखेर सुट्टी संपली आणि शाळेची घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस आणि शाळेत जाण्याची मुलांना लागलेली उत्सुकता तर काही मुलांचे शाळेत नजण्यासाठी रडणे आज शाळेच्या पहिल्या दिवशी पहावयास मिळाले.
सर्वत्र आज शनिवार पासून शाळा सुरु झाल्या शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वच ठीकाणी मुलांचे ढोल वाजवून तर पुष्प रुष्टी करून मुलांचे स्वागत करण्यात आले. तर दोडामार्ग सावंतवाडा येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना फुगे हातात देऊन लाईन मधून शाळेत एन्ट्री केली त्यावेळी पालक व शिक्षकांनी त्या मुलांनावर फुलाची पुष्प ऋष्टी करत त्यांचे स्वागत केले. त्या नंतर त्यांना गोड खाद्य पदार्थ देऊन त्यांचे तोंड गोड केले. जुने नवे मित्र- मैत्रीण भेटल्यावर काही मुलांचि उत्सुकता गगनाला भिडली, मुलांचा सर्वत्र किलबिल आवाज सर्वत्र ऐकायला मिळाला यावेळी शिक्षक, पालक शाळा समिती मोठ्या संख्येने उपस्थित होते.