
सावंतवाडी : ''तुम्हाला रात्री पैसे वाटणारा माणूस पाहिजे की रात्री अपरात्री मदतीला धावून येणारा माणूस पाहिजे, हे तुम्हीच ठरवा असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी सावंतवाडीतील मतदारांना केले आहे.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदारांसाठी पोस्ट व्हायरल केली आहे. सावंतवाडीतील मतदारांसाठी येणाऱ्या काळात आरोग्य, रोजगार या प्रश्नावर काम करायचे आहे. त्यामुळे रात्री अपरात्री पैसे वाटणारा उमेदवार पाहिजे की रात्री अपरात्री मदतीला धावून येणारा ? हे तुम्हीच ठरवा आणि मतदान करा असे आवाहन अर्चना घारे-परब यांनी केले आहे.