
मालवण : येत्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली व यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन पडझड झालेली आहे. वादळी पावसाने शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत ग्रामीण भागात तलाठी व संबंधित अधिकारी यांस पाठवून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत
मालवण, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, देवगड या आठही तालुक्यातील तहसीलदार यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल आपण तात्काळ मागवून घ्यावा व येत्या आठ दिवसांत नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.