कणकवली न. पं. चे प्रशासक म्हणून प्रांताधिकारी कातकर यांच्याकडे जबाबदारी

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 18, 2023 18:55 PM
views 219  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्य लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायतचा प्रशासकचा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे देण्यात आला आहे. कणकवली शहराचा कार्यभार आता प्रशासक म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यामार्फत केला जाणार असून, कणकवली चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची येत्या काही काळात पदोन्नतीने बदली होण्याची शक्यता आहे.

प्रशासकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रांताधिकारी श्री. कातकर यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी भेट घेत त्यांना त्यांच्याशी चर्चा केली. तसेच कणकवली शहरातील प्रशासक म्हणून काम करताना कोणतेही सहकार्याची आवश्यकता असल्यास शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कणकवली शहराचे नागरिक म्हणून आमचे कायमस्वरूपी सहकार्य असेल अशी ग्वाही देखील श्री. नलावडे यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, विराज भोसले, किशोर राणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप राणे, राजा पाटकर आदि उपस्थित होते.