एकाच दिवशी दोन सभा नको

नगरसेविका अक्षता जैतापकर यांची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 09, 2024 20:01 PM
views 234  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा व विशेष सभा एकाच दिवशी घेतली आहे.यावरुन नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी नगराध्यक्षाकडे एक सभा रद्द करण्याची मागणी केली आहे.

नगरपंचायतीच्यावतीने येथील सभागृहात सर्वसाधारण सभा व विशेष सभा आयोजित केली आहे.यावरुन श्रीमती जैतापकर यांनी नगराध्यक्षांना पत्र लिहून एक सभा रद्द करण्याची मागणी केली.एकाच दिवशी दोन सभा असल्याने सभेत विषयांवर विस्तृतपणे चर्चा करता येत नाही. त्यामुळे एकाच दिवशी दोन सभा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.