पोलिसांचेच मेडिकल चेकअप करा

ड्रग्स प्रकरणावरून राणे पिता - पुत्र आक्रमक
Edited by:
Published on: April 11, 2025 18:05 PM
views 604  views

सिंधुदुर्ग : ड्रग्स संदर्भातील माहिती आम्हीच द्यायची तर आम्हाला युनिफॉर्म द्या // आमदार निलेश राणे यांचा संतप्त सवाल // जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना घेतले फैलावर // हे ड्रग्स विकणारे, बीफ विकणारे जिल्ह्यात पॅरलल इकॉनॉमी चालवत आहेत // यावर तुमचं, डिपार्टमेंटच काय लक्ष आहे // मध्ये निवतीला दोन वर्षापूर्वीच्या एका मर्डर केससाठी SP दोन दिवस निवती पोलीस स्टेशनला बसून होते // ही तत्परता कुडाळ मधून गेलेला २५ किलो गांजा गोव्यात पकडला गेला त्यावेळी का झाली नाही // मालवणला एक माणूस सतत तीन दिवस पोलीस स्टेशनला जातोय // त्याची दखल, त्याची कंप्लेंट अद्याप घेतली जात नाहीय // याची काय दाखल घेतली गेली // एवढं बीफ पकडलं गेलं किती धाडी घातल्या गेल्या // अशा प्रश्नाची सरबत्ती आमदार निलेश राणे यांनी केली // यावर सौरभ अग्रवाल यांनी आम्हाला तुम्ही असं काही समजलं तर तात्काळ आम्हाला इन्फरमेशन द्या असे सांगितले // यावर निलेश राणे यांनी संतप्तपणे आम्हाला माहिती द्यायची असेल तर आम्हाला युनिफॉर्म द्या असे सांगितले // यावर खासदार नारायण राणे यांनीही सर्वात प्रथम पोलिसांचेच मेडिकल चेक अप करा असे सांगितले // आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे आपणच गृह मंत्र्यांकडे तक्रार करणे योग्य नाही // 18 - 20 वर्षांची मुलं ड्रग घेतल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत // ही पिढी अशी बरबाद होता कामा नये // यासाठी तुम्ही काय करताय त्याचा अहवाल द्या असेही ते म्हणाले //