आ. ज्ञानेश्वर म्हात्रेंची केसरकरांच्या कार्यालयाला भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: May 05, 2024 08:32 AM
views 69  views

सावंतवाडी : कोकण शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाला भेट देत लोकसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा मतदार संघाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी शिवसेना निवडणूक प्रभारी प्रमुख गुणाजी गावडे आणि तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी आ.म्हात्रे यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे योगेश नाईक,प्रथमेश कुडतरकर,प्रतिक बांदेकर,आबा केसरकर,शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.  आ.म्हात्रे यांनी तालुकाप्रमुख बबन राणे यांच्याशी निवडणुकी संदर्भात चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हात्रे यांनी कोकण मतदार संघात फिरताना महायुतीला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले.या लोकसभा मतदार संघातील विकासकामे मंत्री केसरकर,केंद्रीय मंत्री राणे यांच्यामुळे मार्गी लागली आहे.पंतप्रधान मोदींच्या विकसीत भारत संकल्पनेला येथील मतदारांनाही राणेंच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे या परिस्थितीचा अंदाज घेतला असता मोठ्या मताधिक्याने नारायण राणे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ.म्हात्रे म्हणाले,विरोधकांचं काम टीका करणे असते.विरोध करणे असते.मात्र विकास कामांच्या मुद्द्यांवरच आम्ही निवडणूक लढावत असल्याने मतदारांचा कौल हा आमच्या बाजूनेच आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या मतदार संघात केलेली विकास कामे,दिलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी जनतेला माहित आहे.मी सुद्धा ११०० पेक्षा जास्त शाळांना ई लर्निंग साहित्यासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे शिक्षक संघटना,शिक्षण संस्था यांचीही मते आम्हाला मिळतील यात कोणतीही शंका नाही.मंत्री केसरकरांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय नारायण राणेंचा विजय आणखी सुखकर करतील असा विश्वासही आ. म्हात्रे यांनी व्यक्त केला.