ज्ञानेश्वर बांदेकर यांचं निधन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 17, 2024 08:25 AM
views 854  views

सावंतवाडी : शहरातील ज्ञानेश्वर घनश्याम बांदेकर यांचं रविवारी मध्यरात्री अल्पशा आजारानं निधन झाल. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सोमवारी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर व नार्वेकर कुटुंबाचे ते निकटवर्तीय होते. नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदीर, जुनाबाजार नरसोबा मंदीर येथील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ओटवणे गावातील ते प्रमुख मानकरी होते‌.    रविवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. ‌त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक भाऊ, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  त्यांच्या निधनानं बांदेकर कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.