तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत दिया साटम प्रथम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 16, 2024 14:48 PM
views 223  views

देवगड : स. ह.केळकर कॉलेज देवगड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 8 वी या शालेय गटात प्रथम क्रमांक दिया संदीप साटम, द्वितीय क्रमांक राज्ञी विवेक कुलकर्णी आणि तृतीय क्रमांक स्वालिहा रफिक नायकवडे हिने प्राप्त केला.

सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. दिया साटम हिने वाढदिवसादिवशीच हे यश मिळवले त्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. दिया संदीप साटम हिला डॉ. राजेंद्र चव्हाण ,आई सौ.स्वाती संदीप साटम आणि उमा मिलिंद पवार स्कुल मधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.