दिया मालवणकरचा भाजपाच्या वतिने सत्कार

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश
Edited by:
Published on: March 25, 2025 18:16 PM
views 169  views

वेंगुर्ला : जागृती क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. संजय मालवणकर यांचा खेळामधील वारसा पुढे चालत ठेवून त्यांचीच पुतणी कु.दिया दिलीप मालवणकर हिने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी व ऊंच उडी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवुन वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल भाजपा च्या वतिने माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला. यावेळेस अभिनंदन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले कि , वेंगुर्लेत मैदानी खेळाची मुहूर्तमेढ जागृती कला क्रीडा मंडळाने रोवली व आता त्याच मंडळाची खेळाडू कु.दिया दिलीप मालवणकर हिने राज्यस्तरीय रौप्यपदक मिळवत ती परंपरा चालु ठेवली याबद्दल तिचे कौतुक भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस, माजी नगरसेवीका साक्षी पेडणेकर, अँड. प्रकाश बोवलेकर, शिवदत्त सावंत, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व निलेश गवस, बबन आरोलकर, संदेश नार्वेकर, सुरी कुडाळकर, उदय महाजन, छोटू कुबल, नवनाथ सातार्डेकर तसेच जागृती क्रीडा मंडळाचे दिलीप मालवणकर , विवेक राणे, प्रशांत मालवणकर, अमोल सावंत इत्यादी उपस्थित होते.