कणकवलीत भरणार दिवाळी बाजार..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 30, 2023 12:24 PM
views 277  views

कणकवली : दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षांत दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील कणकवलीत पेट्रोल पंपा समोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भरणार आहे. 6 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

करण्यात येणार आहे. अस्सल घरी बनविलेल्या वस्तू या बाजारात मिळणार आहेत. मुबई, गोवा येथे ज्या पद्धतीने बाजार त्या धर्तीवर  हा बाजार असणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात येणारा फराळ, मेणबत्ती, आकाश कंदील हस्तकलेतून साकारणाऱ्या वस्तुंना या बाजारात व्यासपीठ म्हणून हा उपक्रम राबवीण्यात येणार आहे.  तसेच कुंभार बांधवांनी बनविलेल्या मातीच्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या वस्तू साठी 10 स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच मातीच्या वस्तू बनविण्याचा लाईव्ह डेमो अनुभवता येणार आहे. एकूण 32 स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी लाईट व्यवस्था नगरपचायत मार्फत करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे. बचत गटांच्या स्टॉल वर घरगुती फराळ, कागदी आकाश कंदील, आदी घरगुती वस्तू प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. 6 ते 11नोव्हेंबर पर्यत हा बाजार असणार आहे. घरगुती बनविलेल्या दिवाळी साठीच्या वस्तू ची विक्री येथे असणार आहे. या सर्व विक्रेत्यांची स्टॉल ची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.  पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी या उद्देशाने हे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. या स्टॉल साठी नाव नोंदणी जावेद शेख, सागर होडावडेकर, नऊ झेमने 8625922454, राजा पाटकर 986380738, पंकज पेडणेकर 9890030289, आण्णा कोदे यांच्याकडे करावी. सत्ता नसताना देखील आम्ही राबवलेले उपक्रम सुरू ठेवले असे नलावडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, जावेद शेख, सागर होडावडेकर, नऊ झेमने, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, आदी उपस्थित होते.