
सावंतवाडी : अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र शाखा-जिल्हा सिंधुदुर्गच्या सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक सेवानिवृत्त कलाशिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांचे वडील ज्यांनी ३२ वर्षे देशसेवा करत असताना १४ सेवा पदकांची कमाई केली. यामध्ये १९६१ चे भारत पोर्तुगाल युध्द, १९६२ चे भारत - चीन युध्द, १९६५ व १९७२ चे भारत - पाकिस्तान युध्द या चारही युध्दात विजयी सहभाग व युध्दभूमीवर अग्रेसर होते याच दरम्यान १९७२ च्या भारत पाकिस्तान युध्दादरम्यान डाव्या डोळ्याला गोळी लागून जखमी झाले होते. इजिप्त देशात भारतीय सेनेच्या वतीने शांती सेना म्हणून १ वर्ष इजिप्त येथे गेले होते. तर हुसेनीवाला पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वी पूर्ण केली, तसेच बॉक्सींग, कुस्ती, हॉकी या खेळात भारतीय सैन्यदलाचे नेत्तृत्व करत वरील खेळात चॅम्पियन होते. या सर्व सेवा कार्याची नोंद घेऊन त्या संपुर्ण सेवे दरम्यान त्यांना एकुन १४ सेवे पदके देऊन सन्मानीत केले. या त्यांच्या देशसेवेची आठवण पुरस्काराच्या रूपाने व त्यांच्या नावाने फांउडेंशनचे संस्थापक व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पुरस्कार, पुरस्कार विजेत्यांच्या घरी अथवा त्यांच्या कार्यालयात जाऊन पुरस्कार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दिले जातात. विविध क्षेत्रात दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तींनी दिव्यांगांसाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याची नोंद घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून हे राज्यस्तरीय पुरस्कार कमिटीद्वारे बाळासाहेब आबाजी पाटील, राज्य सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष यांनी जाहीर केले आहेत.
यात सुहास काळे (नागपूर) - अस्थिव्यंग प्रकारातील अपंग असूनही अपंगत्वावर मात करून शासनाच्या सेवेत उच्च पदावर सेवा करून सेवानिवृत झालेले काळे साहेब यांना ऊत्कृष्ट सेवाकार्याचा दिव्यांग जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, हरी परब (सिंधुदुर्ग) - अर्ध प्रकारातील अंध असूनही चित्रकार व पुरातन वस्तुंचा संग्रह जोपासनारे व त्यांचे प्रदर्शन करून अपंगांसाठी कार्य करणारे परब यांना स्पिरीट ऑफ दि डिसेबल पुरस्कार.,विजय टिपुगडे (कोल्हापूर) - अस्थिव्यंग प्रकारातील ही व्यक्ती चित्रकार आहे. यांनी निसर्ग चित्र, रांगोळी व छायाचित्र या कला प्रकारात चित्र व रांगोळी रेखाटून राज्यस्तरावर नांव कमावले आहे त्याच बरोबर ते राज्यस्तरीय परिक्षक म्हणू- नहीं कार्यरत असतात त्यांना बेस्ट डिसेबल आर्टिस्ट पुरस्कार, सौ. संगीता पाटील (सांगली) - अस्थिव्यंग प्रकारातील असून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून त्या सध्यां प्रशासकीय सेवेत ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांच्या या ऊत्कृष्ठ कार्याबद्दल आदर्श प्रशासकिय दिव्यांग कर्मचारी हा पुरस्कार, रूबीन लोखंडे (कोल्हापूर) अपंग असूनही अपंगत्वावर मात करून अपं ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक अपंगांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्वःताच्या पायावर ऊभे करणारे लोखंडे यांना स्पिरीट ऑफ डिसेबल परसन हा पुरस्कार, सौ. सानिका तांबे (सिंधुदुर्ग) - कुबडीच्या आधारे आयुष्य घालवणाऱ्या पण सुदृढ लोकांनाही लाजवेल अशा सौ तांबे या जिल्ह्यात सर्वसाधारन महिलांचे अनेक बचत गट निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देत आहेत या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना स्पिरीट ऑफ डिसेबल लेडी पुरस्कार, राकेश कांबळे (रत्नागिरी)- दोन्ही पाय निकामी असुनही जिद्दीने अपंगासाठी कार्य करणारे राकेश यांना बेस्ट सोशल वर्क फॉर डिसेबल पुरस्कार, श्रीम. रेखाताई गायकवाड (सिंधुदुर्ग - सर्वसाधारण व्यक्ती) - माऊली महिला मंडळाच्या माध्यमातून कर्णबधिर व मतीमंद अशा निवासी शाळेच्या माध्यमातून अनेक अपंगांना शिक्षनाद्वारे कार्य करणाऱ्या रेखाताई यांना बेस्ट सोशल वर्क फॉर डिसेबल हा पुरस्कार, प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई (सिंधुदुर्ग - सर्वसाधारण व्यक्ती) - अपंगांच्या कार्याला सदैव सर्व प्रकारच्या मदतीसाठी तत्पर व कार्यरत असणारे देसाई यांना बेस्ट सपोर्ट फॉर हिसेबल पुरस्कार, समीर चांदरकर (सिंधुदुर्ग - सर्वसाधारण व्यक्ती) - पोर्टेट, लॅन्डस्केप, रांगोळी व हस्तकलेत पारंगत असलेले व राज्यस्तरीय अनेक कलाप्रकारात नावाजलेले चांदरकर यांना अष्टपैलू कलाकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
सर्व पुरस्कार व पुरस्कार वितरणाची सर्व माहिती पुरस्कार विजेत्यांना कळवूनच पुरस्कार विजेत्यांच्या घरी अथवा त्यांच्या कार्यालयात जाऊन ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग फांऊडेंशन व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कार्यकर्ते व प्रतिष्ठत व्यक्तींच्या शुभ हस्ते प्रदान करणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व वृक्ष असे आहे हे सर्व पुरस्कार राज्य सचिव यांनी पुरस्कृत केले आहेत असे बाळासाहेब आबाजी पाटील. राज्य सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष यांनी सांगितले आहे.