
वैभववाडी : कुसूर होळीचा मांड येथे सौ.सुविधा रावराणे, समाधान प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमात दिव्या दिपक खानविलकर ह्या विजेत्या ठरल्या व दिप्ती दिलीप दळवी ह्या उपविजेत्या तर प्राची पुर्वेंद्र साळुंखे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.सर्व विजेत्यांना पैठणी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कुसूर होळीचा मांड येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गावातील महीला मोठ्या संख्येने या खेळात सहभागी झाल्या होत्या.अनेक खेळाच्या माध्यमातून या कार्यक्रमात रंगत आणली.अतिंम फेरीत तीघीजणी पोहचल्या.अखेर अटीतटीच्या खेळात सौ.खानविलकर या विजेत्या ठरल्या तर सौ.दळवी ह्या उपविजेत्या ठरल्या.विजेत्यांना अनुक्रमे रक्कम ३हजार३३३ ,२हजार५५५,२०२० व पैठणी मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी माजी सरपंच शिल्पा पाटील, माजी ग्रा.प.सदस्य. समाधान साळुंखे,सिताकांत साळुंखे,श्रीराम बिल्ले,दिपक खानविलकर,पुर्वेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे निवेदक संतोष टक्के,सलोनी टक्के यांनी काम केल.