
सावंतवाडी : येथील दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशालेचा यंदाचा दहावीचा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० % लागला. परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, पैकी ३३विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत,तर ३विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.
कु. क्लीन्टन फर्नांडिस याने ९८ % गुण मिळवत प्रशाळेतून प्रथम येण्याचा मान पटकवला. कु. वेदिका माने हिने ९५% गुण मिळवून दुसरा तर कु.डेरेन फर्नांडिस याने ९४. ८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकवला.
प्रशाळलेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, मॅनेजर फादर लिजो, शिक्षक पालक समिती अध्यक्षा सौ. रूपा शिरसाट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.