जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते पाककृती स्पर्धेचे उद्घाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 05, 2023 21:22 PM
views 57  views

देवगड : किंजवडे,'खालचीवाडी' येथे गावातील सर्व अंगणवाडी सेविका एकत्र येऊन पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाचणी, तांदूळ ,खोबरे, वरी व पाल्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले होते.

यावेळी किरण टेंबुलकर यांनी आपले विचार मांडले असताना संध्या आपली खाण्याची जीवनशैली बदलली असून ती आरोग्यासाठी घातक आहे.त्यामुळे पूर्वीच्या लोकांचा असलेला आहार हा आरोग्य किती फायद्याचा होता,आणि पूर्वीच्या लोकांच्या आहारातील घटक वापरून या ठिकाणी पदार्थ बनविले आहेत. ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे सहभाग घेतलेल्या सर्व महिलांनी याकडे स्पर्धा म्हणून न पाहता आरोग्याचा भाग म्हणून पहावे. यावेळी सूत्रसंचालन किंजवडे जि. प. खालचीवाडी शाळेच्या शिक्षिका सौ.जान्हवी लोके मॅडम.यांनी केले. तर आभार अंगणवाडी सेविका मनीषा सुर्वे यांनी मानले. यावेळी ग्रामसेवक शिवराज राठोड, अशोक घाडी, विजय सुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ रिया सुर्वे, देऊलवाडी अंगणवाडी सेविका सौ.माधव, परबवाडी अंगणवाडी सेविका सौ पाडावे, घाडी पाडावेवाडी अंगणवाडी सेविका श्रीम परब , व सर्व मदतनीस गावातील महिला वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.