सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. बाळासाहेब नागरगोजे

डाँ अशोक नांदापुरकर यांना बढती
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 16, 2022 14:45 PM
views 448  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी अखेर डाँ नागरगोजे मंगळवारी सायंकाळी रुजू झाले आहेत तर केवळ २ दिवसापुर्वी रुजू झालेल्या डाँ अशोक नांदापुरकर यांना मंगळवारी  या पदावरुन  कार्यमुक्त होण्याच्या आदेशावरुन ते कार्यमुक्त झाले आहेत. नांदापूरकर यांना शासनाने बढती दिली असून त्यांना पुणे येथे आरोग्य उपसंचालक म्हणून बढती दिली आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाँ श्रीपाद पाटील यांनी कोरोना काळापासून गेली दिड वर्ष या पदाचा कार्यभार  सांभाळत चांगली रुग्णसेवा दिली होती. 

       येथील जिल्हा शल्य चिकित्सक पदाच्या नियुक्तीची रंगीत खुर्ची गेला आठवडाभर सुरु होती. त्याला शासनाने पुर्णवीराम दिला आहे. जिल्हा रुग्णालय त्यातच वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे यामुळे रुग्णालय सेवेवर त्याचा परिणाम होत होता. शासनाने डाँ नागरगोजे यांची पहिली नियुक्ती दिली होती. त्याला पुन्हा स्थगिती देत या पदावर डाँ नांदापुरकर यांना नियुक्ती दिली. ते दोन दिवसापुर्वी हजरही झाले. मात्र आज कोल्हापुर आरोग्य उपसंचालकानी या पदावरून कार्यमुक्त करावे असे आदेश काढले. त्यामुसार त्यांनी या पदाचा कार्यभार सोडला. व डाँ नागरगोजे यांनी मंगळवारी सायंकाळी या पदाचा कार्यभार स्विकारला. ते लातुर जिल्हातील असून त्यांनी २२ वर्षे आरोग्य विभागात सेवा केली आहे. प्रथमच या जिल्हात आपण आलो असून या जिल्हात चांगले काम करु असेही ते म्हणाले.

      डाँ अशोक नांदापुरकर यांना शासनाने बढती देत पुणे येथे आरोग्य उपसंचालक पदी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे ते या पदावरून लागलीच कार्यमुक्त झाले.