जिल्हा नियोजनची सभा ११ एप्रिलला

Edited by:
Published on: April 07, 2025 14:04 PM
views 277  views

सिंधुदुर्गनगरी : २०२५ - २६ या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजनची सभा येत्या ११ एप्रिलला दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. मागील सभेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढील वर्षी विकास कामाचे नियोजन एप्रिलमध्येच करण्यात येईल अशी घोषणा केली होती, त्यानुसार आर्थिक वर्ष समता संपताच एप्रिलमध्ये जिल्हा नियोजनची सभा लावण्यात आली आहे. या नियोजन सभेत पुढील दोन - तीन पावसाचे महिने लक्षात घेता एप्रिलमध्येच विकास कामाच्या नियोजनाबाबत चर्चा आणि निर्णय होणार आहेत आणि ऑक्टोबर पर्यंत कामाला सुरुवात करण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहे. अनेक वेळा उशिराने कामे सुरू होत असल्याने निधीही अकरचित राहतो. मात्र, पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणे यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला असून, या अनुषंगानेच आर्थिक वर्ष संपता संपताच समितीची बैठक लावण्यात आली आहे.