
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने बॅ. नाथ पै विद्यालय (कुडाळेश्वर मंदीर जवळ) कुडाळ येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी भव्य वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १०.३० वाजता संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. नीलम धुरी यांच्या अध्यक्षतेखाली माजी जि. प. सदस्य अमरसेन सावंत यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिंगुळी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या सौ. उर्मिला उल्हास धुरी, कुडाळेश्वर देवस्थानचे मानकरी नारायण गंगाराम राऊळ, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदासेन सावंत, तालुका महिला उपाध्यक्षा प्रा. पूनम सावंत, प्रा. पुष्पराज सावंत, प्रा. प्रथमेश परब, सोमेश्वर सावंत, राकेश देसाई, व्यवस्थापक राजेंद्र तिरोडकर हे उपस्थित राखणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये आपल्या स्वकर्तृत्वाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या व समाजासाठी मोलाचे योगदान दिलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये अमित पालव (उपसरपंच मुळदे), समीक्षा अमित पालव (मुळदे), सुलक्षणा सखाराम देसाई (कुडाळ-तळकट), सुनंदा सूर्यकांत राऊळ (माजी पंचायत समिती सदस्या, सावतवाडी), दीप्ती दिवाकर कानडे (ग्रामपंचायत सदस्या, बिबवणे), नारायण गंगाराम राऊळ (कुडाळेश्वर देवस्थानचे मानकरी), निमिष देवेंद्र धुरी (सावंतवाडी) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्यास येताना वधू-वरांनी व पालकांनी फोटो आणि अन्य वैयक्तिक माहिती घेऊन येऊन प्रथम नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. वधू-वरांसोबत पालकांनीही या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष सदासेन सावंत, महिला अध्यक्षा प्रा. सौ. नीलम धुरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सदासेन सावंत (९६०४९४९६६९), राजेंद्र तिरोडकर (९४२०३०७३३१), प्रा. नीलम धुरी (९४०३५६२०३९) यांच्याशी संपर्क साधावा. वधू-वरांची विवाह नोंदणी कुडाळ येथील जिल्हा कार्यालयात सुरू आहे.










