महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र

SSPM इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 20:07 PM
views 322  views

कुडाळ : "ध्यास नाविन्याचा शोध नवउद्योजकांचा" या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या स्टेट इनोवेशन सोसायटीने गुरुवारी  संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र आयोजित केले होते. सदर सत्रामध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला.

यासंबंधी कॉलेजचे इन इनक्यूबेशन इंचार्ज डॉ. साजीद मुल्ला व मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक कल्पेश सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागाचे कु. आदित्य चौघुले, कु. आदित्य डोयले , कु. नयन कदम, कु. हर्षल गावडे , कॉम्पुटर विभागाचे कु. काजल निकम व कु. सायली नार्वेकर तसेच ए.आइ.एम.एल. विभागाचे कु. ललित पहाडिया, कु. मदन पाटील व कु. प्रणव मोदी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

प्रशिक्षण शिबिरामध्ये नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतच्या माहिती सत्रामध्ये SNDT मुंबई विद्यापीठाचे इनक्युबेशन डायरेक्टर डॉ. आशिष पाणत यांनी पथ-प्रदर्शन केले. तसेच स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ सल्लागारांची सत्रे व नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पांचे कार्यक्रम आयोजित झाले ज्यांचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना व नवउद्योजकांना होऊ शकेल.

सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी SSPM संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खा. निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रा. डॉ. अनिश गांगल, उपप्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांनी प्रोत्साहन दिले.