देवगडात जिल्‍हास्‍तरीय खुली निबंध स्‍पर्धा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 02, 2024 11:45 AM
views 52  views

देवगड : सांविधानिक विचारमंच देवगडच्‍यावतीने देवगड तहसिलदार कार्यालयाच्‍या नजिकच्‍या पटांगणात छ. शिवाजी महाराज, महात्‍मा ज्‍योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल रोजी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्‍ताने जिल्‍हास्‍तरीय खुली निबंध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या निबंध स्‍पर्धेसाठी भारतीय संविधानाची 75 वर्षे आणि स्‍त्रीजीवनाचे परिवर्तन, दी प्रॉब्‍लेम रूपीची 100 वर्षे आणि समाजाचे अर्थकारण, भारतीय संविधान आणि स्‍त्री शक्‍ती, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन,फुल्‍यांची पहिली शाळा आणि आजचे स्‍त्री शिक्षण असे पाच विषय देण्‍यात आले आहेत.

या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रूपये 5000/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तीपत्र, प्रथम क्रमांकासाठी रोख रूपये 5000/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तीपत्र, व्दितीय क्रमांकासाठी रोख रूपये 3000/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रूपये 2000/-सन्‍मान चिन्‍ह आणि रोख रूपये 1000/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तीपत्र अशी उत्‍तेजनार्थ तीन बक्षीसे दिली जाणार आहेत.

निबंध स्‍पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा तरी या निबंध स्‍पर्धेत जास्‍तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे सांगण्यात आले आहेत.