तह‍सीलदार पवारांच्या हस्‍ते नवमतदारांना ई -पीक ओळखपत्र वाटप

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 24, 2026 11:35 AM
views 68  views

देवगड : राष्‍ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा करण्‍यात येतो.यावर्षी रविवारची शासकिय सुट्टी असल्‍याने२३ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी तहसीलदार यांचे कार्यालयात राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्‍य साधून मतदारांसाठीची शपथ ग्रहण करण्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला.सर्व कर्मचारी,अधिकारी यांनी मतदारांसाठीची शपथ ग्रहण केली.  

यावेळी तहसीलदार रमेश पवार,नायब तहसीलदार विवेक शेट, महसूल नायब तहसलीलदार संतोष खरात,निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, पुरवठा निरिीक्षक अधिकारी संग्राम गुट्टे, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशिद,निवडणूक महसूल सहाय्यक रमेश मोरे व सर्व कर्मचारी आणि नवीन मतदार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्‍य साधून प्रदिप कदम यांनी राष्‍ट्रीय मतदार दिवासाचे महत्‍व विषद केले. तहसीलदार पवार यांनी राष्‍ट्रीय मतदार दिवासाच्‍या कार्यक्रम लोकशाहीसाठी आणि मतदारांसाठी किती महत्‍वाचा आहे याची माहिती दिली.यानंतर नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्‍यात आले.