जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उद्या वैभववाडीत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 27, 2023 17:38 PM
views 107  views

वैभववाडी : जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उद्या (ता.२८)  वैभववाडी येथे संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकाळी ११.०० वा आयोजित करण्यात आला आहे.
 जिल्हास्तरावरील राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यावर्षी वैभववाडी तालुक्याची निवड करण्यात आली आहे.


या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनाचे प्रमुख, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिकांनी  उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले आहे.