
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचे निर्माते तथा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवारी संध्याकाळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
संध्याकाळी ठीक ७ वा. जि. प. प्राथमिक शाळा दोडामार्ग यांच्या पटांगणात ही स्पर्धा सुरु होणार आहे. भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कबड्डी चाहत्यांनी स्पर्धेच्या उदघाट्न कार्यक्रम प्रसंगी तसेच स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केली आहे.