सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी व विदयार्थिनींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविदयालय येथे स्पर्धा घेण्यात येणार आहे. रविवार 19 जानेवारी रोजी सकाळी 09:30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल.
यात गट एक चौदा वर्षाखालील मुले, चौदा वर्षाखालील मुली आणि गट दोन, अकरा वर्षाखालील मुले, आठ वर्षाखालील मुले, दहा वर्षाखालील मुली अशा दोन गटात स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी स्वता:चा बोर्ड आणावयाचा आहे. पहिल्या गटात मुलांचे पाच व मुलींचे पाच असे दहा क्रमांक आणि दुस-या गटात मुलांचे आठ व मुलींचे तीन असे अकरा क्रमांक मिळून एकवीस क्रमांकांना रोख बक्षिस, चषक, मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील स्पर्धकाला वेगवेगळया खेळाडूंसोबत खेळायला मिळणार आहे.
राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल. स्पर्धेत नाव देण्यासाठी व इतर माहीतीसाठी कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे. स्पर्धेसाठी 17 जानेवारीपर्यंत नावे घेतली जातील.आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम व बंधनकारक राहील.