
सावंतवाडी : सावंतवाडीत २८ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय पुस्तक रसग्रहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या आयोजनाखाली सदर संमेलन होत आहे. या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकाना प्रत्येकी १ हजार तर ५०० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा रविवार ७ डिसेंबरला होत आहे. यात आपल्याला आवडलेलं कोणतेही पुस्तक निवडता येईल. रसग्रहण सादरीकरणासाठी ७ मिनिटे वेळ दिला जाईल.
पुस्तक रसग्रहण स्पर्धा फक्त शिक्षकांसाठी असून अंगणवाडी ते महाविद्यालय स्तरावर शिक्षकांना सहभाग घेता येईल. कोणत्याही साहित्य प्रकारातील मराठी भाषेतील पुस्तक यासाठी निवडता येईल. सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी तिचं टाचण देणे बंधनकारक आहे. तसेच आपले नाव देताना आपली शाळा किंवा महाविवद्यालय याचा उल्लेख करावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विठ्ठल कदम ९८२३०४८१२६ किंवा विजय ठाकर, स्मिता खानोलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संमेलन आयॉन समीतर्फे करण्यात आले आहे.










