जिल्हा न्यायाधीश दीपक माल्हटकर यांचा मुळगावी सन्मान

Edited by:
Published on: May 30, 2024 05:22 AM
views 299  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावचे सुपुत्र दीपक बाबली माल्हटकर यांना नुकतीच जिल्हा न्यायाधीश म्हणून नागपूर येथे पदोन्नती मिळाली. नागपूर येथे  माल्हटकर हे सध्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच नामदार सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नॉम्स प्रमाणे ते रेग्युलर जिल्हा न्यायाधीश या परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण झालेत. जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाल्यानंतर ते आपल्या गावी प्रथमच उन्हाळी सुट्टीत आले आहेत.

त्यांच्या माडखोल येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या मराठा समाज मित्र मंडळीनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक राजू सावंत प्रभावळकर यांनी प्रभावळकर घराण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांना फेटा बांधून पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक भाग्यवंत वाडीकर, सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक राजू तावडे, राजू सावंत, श्री. आर. आर. सावंत,ॲड. जयसिंग वारंग, ॲड. प्रवीण वंजारे, शासकीय ठेकेदार अनिकेत वाडीकर उपस्थित होते. 

दीपक माल्हटकल हे 2008 पासून न्यायव्यवस्थेत न्यायाधीश पदावर कार्यरत आहे. अलीकडेच त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळालेली होती. त्याप्रमाणे ते नागपूर येथे तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.व अलीकडेच नामदार सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नॉम्स प्रमाणे  रेग्युलर जिल्हा न्यायाधीश या परीक्षेला सुद्धा उत्तीर्ण झालेत.  नामदार उच्च न्यायालय मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या सदरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व  जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाल्यानंतर ते आपल्या माडखोल गावी ते  प्रथमच उन्हाळी सुट्टीत आले आहेत. दररोज विविध क्षेत्रातील लोक  व मित्रमंडळी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत.