जिल्हा क्रिकेट असोसिएशनं घेतली युवराजांची भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 28, 2023 14:24 PM
views 204  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनं भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी जिमखाना मैदाना संदर्भात चर्चा करण्यात आली. 

जिमखाना मैदान हे क्रिकेट खेळासाठी देण्यात यावं, अशी आग्रही मागणी क्रिकेट असोसिएशननं या भेटीत केली आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थान काळात जिमखाना मैदान खेळासाठी देणाऱ्या राजघराण्याचे वंशज युवराज लखमराजे यांचंही लक्ष वेधण्यात आल. त्याला युवराज लखमराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

लवकरच राजघराण्याच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यासाठीचा मानस युवराज लखमराजे यांनी व्यक्त केला. यावेळी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मंदार नार्वेकर, राजन नाईक, बाबा खान, रघु धारणकर, अजित नाईक, बाबल्या दुभाषी, बाळा चोडणकर, नंदू रेडकर, बंड्या कोरगावकर, शशी देऊळकर आदी उपस्थित होते.