LIVE UPDATES

दोडामार्गसाठीच्या वैकुंठ रथाचे लोकार्पण

विशाल परब यांच्या माध्यमातून उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 14, 2026 15:42 PM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने दोडामार्ग तालुक्यात वैकुंठ रथ प्रदान करण्यात आला. या रथाचे लोकार्पण प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर व भाजप युवा मोर्चा गोवा प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर आदींसह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

 डोंगरी आणि ग्रामीण तालुका म्हणून ओळखले जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यात कित्येक वर्षे  वैकुंठ रथाची मागणी होती. अखेर युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण करण्यात आली. विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित महा आरोग्य शिबिरावेळी वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी नगरध्यक्ष चेतन चव्हाण, सभापती पार्वती गवस, जि.प सदस्य श्वेता धरणे, पराषर सावंत, ओंकार रेडकर, रंगनाथ गवस, आनंद तळणकर, अंकुश नाईक, महिला शहर अध्यक्ष सविता नाईक, नगरसेवक संध्या प्रसादी, दीपिका मयेकर, आकक्षा शेटकर, सोनल म्हावळणकर, सुनील गवस, दीपक गवस, गौरी पार्सेकर, संजय सातार्डेकर, भैया पांगम, दिक्षा महालकर  डॉ. रामदास रेडकर, सुधीर दळवी आदी उपस्थित होते. 

    यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण बोलताना म्हणाले की, दोडामार्ग शहर आणि संपूर्ण तालुकावासियांना या वैकुंठ रथाची गरज होती. कुठच्याही गावात एखाद्या चे निधन झाले की त्यांना स्मशानभूमीपर्यंत नेताना अनेक अडचणी येतात. या अगोदर विवेकानंद नाईक यांची व्हॅन होती. मात्र, ती व्हॅन सगळीकडे फिरणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही दुसरी व्हॅन मिळावी यासाठी विशाल परब यांच्याकडे मागणी केली होती. ती मागणी आज विशाल परब यांच्या वाढदिवसा निमित्त वैकुंठ रथाच्या माध्यमातून पूर्ण झाली. त्यामुळे त्यांचे दोडामार्ग तालुक्याच्या वतीने खूप आभार मानतो अशी भावना व्यक्त केली.