जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पूर्वा गावडेचं खास कौतुक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 31, 2023 19:49 PM
views 137  views

सिंधुदुर्ग : पूर्वा गावडे हीने कष्ट व मेहनती च्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. तिने राष्ट्रीय स्तरा पाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिची होणारी निवड हा सिंधुदूर्ग वासियांसाठी सुदिन असेल अशा शब्दात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय जल तरण खेळाडू पूर्वा गावडे हिला शुभेच्छा दिल्या. 

सिंधुदूर्ग नगरी चे रहिवासी आणि मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष  संदीप गावडे यांची कन्या पूर्वा गावडे ही जलतरण पटू असून तिची आता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ती सहभागी झाली होती. विशेष म्हणजे वय कमी असूनही तिला सीनिअर गटातून संधी देण्यात आली होती. मात्र येथेही तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत चौथा क्रमांक पटकावला. 

पुणे येथील बालेवाडी अकादमी त जलतरणाचे प्रशिक्षण घेणाऱ्या या सिंधू कन्येने आता पर्यंतच्या प्रवासात राज्य व राष्ट्रीय स्तरावर ७६ पदके मिळवली आहेत.  सिंधुदुर्गनगरी येथे आलेल्या पूर्वा हीचा मुख्यालय पत्रकार समिती च्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन तिचा मा सन्मान करण्यात आला. 

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकर संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लवू महाडेश्वर, उपाध्यक्ष विनोद परब, खजिनदार गिरीश परब, सह सचिव सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर, संजय वालावलकर, विनोद दळवी , दत्तप्रसाद वालावलकर, माहिती कार्यालयाचे अमित राणे, पूर्वा ची आई सौ रश्मी संदीप गावडे आदी उपस्थित होते.


पूर्वा हीची कामगिरी गौरविताना तिच्या यशस्वीतेसाठी तिच्या आई वडिलांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही असे सांगत  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संदीप आणि रश्मी गावडे यांचे ही कौतुक केले. 

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी ही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पूर्वा चे अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष बाळ खडपकार यांनी मनोगत व्यक्त केले. लवू म्हाडेश्र्वर यांनी सूत्र संचालन केले तर विनोद दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.