पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १ मे रोजी जिल्हा बँक शिरगांव शाखेचे उदघाटन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 30, 2026 12:32 PM
views 37  views

देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिरगांव जिल्हा बँक शाखेचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिरगाव येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्वमालकिच्या शाखेचे नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा (सुधीर साटम यांची इमारत) शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी होणार असून या इमारतीचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमत्री सिंधुदुर्ग नाम. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे जिल्हा बँकेचे प्र.मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई यांनी केले आहे.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची असुन माजी आमदार अजित गोगटे, बँक संचालक प्रकाश बोडस, जि.प. सदस्य देवदत्त कदम, शिरगाव प.स. सदस्य शीतल तावडे, तळवडे प.सं सदस्य सलोनी तळवडेकर, शिरगाव वि. सोसा. चेअरमन विश्राम लोके साळशी वि. सोसा. चेअरमन सत्यवान सावंत, हडपीड वि.सोसा. चेअरमन रामचंद्र राणे, तोरसोळे वि. सोसा.चेअरमन अरविंद पवार, महाळुंगे नाद वि सोसा.चेअरमन सुरेश राणे, तळेबाजार वि. सोसा. चेअरमन सदानंद देसाई, कुवळे वि. सोसा.चेअरमन सुभाष नार्वेकर आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित रहाणार आहेत.