राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: July 30, 2024 06:22 AM
views 310  views

सावंतवाडी : कै. राजन आंगणे मित्रमंडळ आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी राजन आंगणे मित्रमंडळाचे, माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, उद्योजक अतुल पेंढारकर, बंटी पुरोहित यांचे सहकार्य लाभले. उद्योजक कै राजन आंगणे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कला व क्रिडा उपक्रमांसह गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सढळहस्ते मदत करीत असत. त्यामुळे कै राजन आंगणे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी या छत्र्या राजन आंगणे मित्रमंडळाने सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केल्या.

रोणापाल येथील दयासागर छात्रालय, ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिर आणि सावंतवाडी येथील वि स खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे, सचिव भार्गवराम शिरोडकर, दीपक गांवकर, दयासागर छात्रालयाचे जीवबा वीर, मंगल कामत, रवळनाथ विद्यामंदिरच्या संजीवनी गवस एकनाथ धोंगडे, पी एम कांबळे, एन व्ही राऊळ, शंकर बिरोडकर, मंगेश गावकर शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत, वि स खांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार, श्री. परिट, श्री. कोळी, श्री. धुमाळे, श्रीम. घोगरे सौ. शृंगारे, सौ. इन्सुलकर शिक्षक व शिक्षिका  उपस्थित होते.