विशाल परब यांच्याकडून भाजी - फळ विक्रेत्याना छत्री वाटप

Edited by:
Published on: June 11, 2024 10:19 AM
views 167  views

दोडामार्ग : भाजप पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील. पुढील काळात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण  यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेतले जातील. मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि यापुढे ही करणार आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग येथे व्यक्त केला.

विशाल परब यांच्या माध्यमातून आज दोडामार्ग बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्या व ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत नगरपंचायत नगरसेवक राजेंद्र प्रसादी, नितीन मणेरीकर, रामचंद्र ठाकूर, रंगानाथ गवस, समीर रेडकर, देवेंद्र शेटकर, मकरंद तोरस्कर, वैभव फाटक, नगरसेविका  सौं.मृणाली म्हावळणकर, सौं. क्रांती जाधव,सौं गौरी पार्सेकर, सौं संध्या प्रसादी, शुभम गवस, सागर शिरसाट, भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.