विद्या विहार स्कूल, आरोसमध्ये स्पोर्ट्स युनिफॉर्मचे वाटप

अर्चना घारे-परब यांचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 17:59 PM
views 65  views

सावंतवाडी : आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते स्पोर्ट्स युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्गातील विद्यार्थी अत्यंत हुशार व मेहनती आहेत. त्यांना जर योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर ते क्रीडा क्षेत्रात देखील सिंधुदुर्गचे नाव रोशन करू शकतात. त्यामुळेच माझा नेहमी खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढाकार असतो. आरोस शाळेतील विद्यार्थी भविष्यात आपल्या परिसराचे नाव उज्वल करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


यावेळी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्ष हेंंमचंद्र सावळ, संचालक प्रमिला नाईक, सचिव शांताराम गावडे, खजिनदार नारायण मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते दादा घोगळे, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षक निलेश देऊलकर, सुषमा मांजरेकर, अनुष्का गावडे, रूपा कामत, शालेय मुख्यमंत्री कु. मयुरी आरोसकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.