आयडीयल स्कूल नेरूरमध्ये शालेय साहित्य वाटप !

मनसेचा राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम
Edited by: ब्युरो
Published on: June 17, 2024 09:06 AM
views 78  views

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना राज्य अध्यक्ष श्री जय शृंगारपुरे व अमेझॉन कंपनी यांच्या सौजन्याने आयडीयल इंग्लिश मिडीयम इको स्कूल नेरूर येथे  15 जून 2024 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य असणाऱ्या किटचे वाटप करण्यात आले. 

उपस्थित मान्यवरांचे बेलाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री जय शृंगारपुरे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जे जे उपक्रम शाळेत राबवाल त्याला मी नेहमीच सहकार्य करेन ही ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर त्यांचे सहकारी निनाद, तेजस, प्रवीण नेरुरकर, नेरूर समृद्धी प्रतिष्ठान या संस्थेचे चेअरमन डॉ नंदिनी देशमुख, सचिव डॉ व्यंकटेश भंडारी, स्कूलचे मुख्याध्यापक सौरभ पाटकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नंदिनी देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध समालोचक बादल चौधरी यांनी केले.